खेळाडूंनी थोडेसे कणखर व्हायला हवे – बिल डाल्टन

अतिरिक्त सुर्यप्रकाशाने खेळ थांबल्यानंतर नेपियरच्या मेयरचा सल्ला

नेपियर – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 157 धावांमध्येच बाद केल्या नंतर 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव तब्बल 2 वेळा थांबवण्यात आला. पहिल्यांदा नियोजित वेळेआधी न्यूझीलंडचा डाव संपला. त्यामुळे भारताला लगेच फलंदाजीसाठी यावे लागले होते त्यामुळे उपहाराची विश्रांती घेण्यात आली. तर, दुसऱ्या वेळी अति सूर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आला होता. मात्र याबाबत नेपियरचे मेयर बिल डाल्टन यांनी खेळाडूंना कणखर होण्याचा सल्ला दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताची फलंदाजी सुरु असताना क्रिकेट इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला. फलंदाजी करताना सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने खेळ थांबवण्यात आला होता. शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याने चेंडू दिसत नसल्याची पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचांनी याबाबत चर्चा करून सामना थोड्या कालावधीसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. अपुऱ्या प्रकाशामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागतो, मात्र, पहिल्या सामन्यात अति प्रकाशामुळे खेळ थांबला. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे.

याबाबत बोलताना नेपियरचे मेयर डाल्टन खेळाडूंना म्हणाले की खेळाडूंनी थोडेसे कणखर व्हायला हवे. सूर्यप्रकाश अधिक आहे म्हणून सामना थांबवण्यात येणे हे कितपत बरोबर आहे याबाबत मी बोलणार नाही. मात्र, अशीच गोष्ट जर भारतात घडली असती, तर तो सामना थांबवण्यात आला असता का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. हे खेळाडू म्हणून मैदानात वावरत असतात. त्यांचा खेळ हा मैदानी खेळ आहे. त्यामुळे डोळ्यावर थोडीशी सूर्यकिरणे आली, म्हणून खेळ थांबवणे हे मला तरी पटलेले नाही. खेळाडूंनी या संदर्भात थोडेसे कणखर व्हायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)