कोहिमा (नागालॅंड) – नागालॅंड मधील राज्यसभेच्या एकमेव जागेवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये नागालॅंड पीपल्स फ्रंटने आपलाही उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने सत्ताधारी भाजप आघाडीला तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
एनपीएफचे अध्यक्ष शूरहोझेली लीझिएत्सू यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते टीआर झेलियांग यांना राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक लढवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे.या पक्षाने त्यांनाच आपले उमेदवार घोषित केले आहे भारतीय जनता पक्षाने या आधीच या जागेसाठी राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा एस फांगनॉन कोन्याक यांना उमेदवारी दिली आहे.
एनपीएफच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी रविवारी कोहिमा येथे पक्षाचे नेते आणि आमदारांची तातडीची बैठक होणार आहे. एनपीएफ हा पक्ष भाजप प्रणित एनडीए आघाडीचा घटक पक्ष आहे.