मुंबई – कॉंग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवार म्हणून जयश्री चंद्रकांत जाधव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जयश्री यांचे पती चंद्रकांत जाधव यांचे गतवर्षी कोविड मुळे निधन झाल्याने या जागेवर निवडणूक ही पोटनिवडणूक घेतली जात आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.12 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कॉंग्रेस उमेदवाराला समर्थन दिले आहे.
त्यामुळे तेथे तीन पक्षाच्या उमेदवार म्हणून जयश्री जाधव यांचे पारडे जड मानले जात आहे. या जागेवर शिवसेनेचेही प्रबळ दावेदारी होती पण त्यांनी कॉंग्रेस उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केल्याने या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध राहिली.