नवी दिल्ली – अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा हे लग्नासाठी सज्ज झाले आहेत, हे दोघे 13 मे रोजी दिल्लीत यांचा साखरपुडा होईल. सुमारे 150 जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या कार्यक्रमाला राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक सदस्य उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी परिणिती आणि राघवच्या फोटोंचा कोलाज सोशल मीटिडयावर शेअर केला आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेले अनेक दिवस ते एकत्र फिरत असल्याने त्यांच्या लग्नाच्या बातम्या पसरल्या होत्या.
ते नुकतेच मोहाली क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल मॅच पाहण्यासाठी एकत्र आले होते. परिणिती आणि राघव लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकले आहेत आणि बऱ्याच काळापासून मित्र आहेत. परिणिती आणि राघवही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.