12 मृत्यू : अत्यवस्थांची संख्याही 400 च्या पुढे
पुणे – शहरात करोना बाधितांची संख्या वाढतच असून, रविवारी 852 नवे बाधित समोर आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आतापर्यंत तब्बल 21,520 चा टप्पा पार केला आहे. तर, अत्यवस्थ बाधितांची संख्याही 400 च्या पुढे गेली आहे. रविवारी करोनामुळे 12 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
रविवारी (दि. 5) शहरात 611 स्वॅब घेण्यात आले आहे. तर, कालच्या तपासणीतील 2 हजार 93 स्वॅबचा अहवाल प्रतीक्षेत आहे. सध्या नायडू, ससून आणि खासगी रुग्णालयांत 7,696 बाधितांवार उपचार सुरू आहेत. त्यातील 410 जणांची प्रकृती चिंताजनक असून, तब्बल 70 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत, तर 340 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शनिवारी दिवसभरात 420 जण करोनामुक्त झाले असून, करोनातून बरे होऊन घरी गेलेल्यांच्या संख्येनेही 13 हजार 109 चा टप्पा पार केल्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.