बर्लिन: करोना रूग्णांवरील उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांचा उपयोग होतो काय याची खातरजमा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने या औषधांच्या चाचण्या सुरू केल्या होत्या. पण
संघटनेने आता या चाचण्या थांबवल्या आहेत. या संबंधात नेमण्यात आलेल्या समितीची शिफारस आम्ही मान्य करायची ठरवली असून आता या चाचण्या थांबवण्यात येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
करोनाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पेशंटवर परिणामकारक उपाय म्हणून या औषधांचा उपयोग केला जात होता. या ओैषधाच्या परिणामकारकतेबद्दल ज्या चाचण्या
झाल्या आहेत त्यातून करोना बरा होण्यासाठी या औषधाचा फारच कमी उपयोग होत असल्याचे निदर्शनाला आले आहे असे या संघटनेने म्हटले आहे.
आमच्या निष्कर्षाचा ज्यांनी या आधी हे औषध घेतले आहे किंवा जे सध्या हे औषध घेत आहेत त्यांच्यावर फार परिणाम होण्याची शक्यता नाही. म्हणजेच हे औषध जे घेत आहेत त्यांनी या निष्कर्षाची फार चिंता करण्याची गरज नाही असेही या संघटनेने
म्हटले आहे.