नेवासा (प्रतिनिधी) :- नेवासा-शेवगाव राज्यमार्गावरील हंडीनिमगाव शिवारात उसाने भरलेल्या ट्रकने मोटारसायकलस्वारास दिलेल्या जोरदार धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
सखाहरी मुंगसे यांच्या पत्नी लंकाबाई मुंगसे यांचे नेवासा फाटा येथील एका खासगी दवाखान्यात औषधोपचार चालू असल्यामुळे उपचारार्थ दवाखान्यात आणण्यात आले होते. औषधोपचार आटोपून देडगाव येथे दुचाकी (एम.एच.17.बी.के 1614)वरून जात असताना उसाने भरलेल्या ट्रकने (क्रमांक एम.एच 43ई. 2421) पाठीमागून येऊन जोराची धडक दिली.
लंकाबाई मुंगसे यांच्या अंगावरून ट्रक गेला. नेवासा फाटा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुरमे येथे डबल ट्रॅक्टर ट्रॉली कारवर धडकून दुसरा अपघात झालेला असतानाही प्रादेशिक परिवहन खात्याचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.