अंकारा – तुर्कस्तान आणि शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नूरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीमध्ये किमान 1000 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 2300 लोक जखमी झाले आहेत. 10 शहरांमधील 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती देशाचे उपाध्यक्ष फियाट ओकटे यांनी दिली आहे. त्याच वेळी, सीरियामध्ये किमान 350 लोक मारले गेले आणि 639 जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू गॅझियानटेपपासून सुमारे 33 किलोमीटर (20 मैल) आणि नूरदगी शहरापासून सुमारे 26 किलोमीटर (16 मैल) अंतरावर होता. हे 18 किलोमीटर (11 मैल) खोलीवर केंद्रित होते. सीरियापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपामुळे अनेक जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
तुर्कीच्या दक्षिणेकडील भागाला आणि सीरियाच्या उत्तरेकडील भागाला आज भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. या भूकंपामुळे शेकडो इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. भूकंपामुळे किमान 1300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही शेकडो जण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. गाडल्या गेलेल्या व्यक्तींना शोधून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक वेळेनुसार, तुर्कीमध्ये पहाटे 04:17 वाजता भूकंप झाला. भूकंपाचे हादरे दूरवर इजिप्तमधील कैरोपर्यंत जाणवले होते. भूकंपाची तीव्रता सीरियाच्या सीमेपासून तब्बल 90 किलोमीटरच्या परिसरात जाणवली. तुर्कीच्या सीमेला लागून असलेल्या प्रांताची राजधानी गाझियांतेमध्येही हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी होती, असे तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर पहाटेपासून दुपारपर्यंत 20 आफ्टरशॉकदेखील जाणवले.
7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर 7.5 रिश्टर स्केलचा दुसरा मोठा भूकंप झाला. त्यामुळे लोक भयभीत झाले. दोन्ही भूकंपांनी तुर्कस्तान आणि सीरिया किमान सहा वेळा हादरले. सर्वात मोठा धक्का 40 सेकंद जाणवला. यामुळे सर्वाधिक विध्वंसही झाला.
आज पहाटेच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची जाणीव होताच लोक पहाटेच्या गारठ्याच्या स्थितीतच आपापल्या घरांमधून रस्त्यांवर धावले. भूकंपाच्या मुख्य धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. त्यानंतरही अनेक धक्के (आफ्टरशॉक) जाणवत होते. तुर्की आणि सीरियातील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती होती. तुर्कीतील अदाना शहरात एकाच परिसरातील तीन इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांना सोडवण्यासाठी अवजड यंत्रसामुग्रीच्या मदतीने ढिगारे उपसायला सुरुवात झाली आहे. या शहरात जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. त्याच प्रमाणे सीमेपलिकडे सीरियाच्या हद्दीमध्येही भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे.
High Speed Railway : पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी – उपमुख्यमंत्री फडणवीस
सीरियामध्ये दीर्घकाळापासून असलेल्या यादवी युद्धामुळे सीरियाच्याच अन्य भागांमधून विस्थापित झालेल्या 40 लाख लोकांचे वास्तव्य या भागात आहे. पूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे मोडकळीस आलेल्या इमारतींमध्येच अनेक जण दाटीवाटीने रहात आहेत. या इमारती धडाधड कोसळल्यामुळे शेकडो कुटुंबे ढिगाऱ्यांखाली गाडली गेली आहेत. सीरियाच्या कमकुवत आरोग्य सेवा या जखमींवर उपचार करण्यास असमर्थ ठरत आहेत, असे “व्हाईट हेल्मेट’ या आपत्कालिन सेवेसाठीच्या संघटनेने म्हटले आहे. सीरियात या भूकंपामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या शेकडो असण्याचा अंदाज आरोग्य विभागातील डॉक्टरांनीच व्यक्त केला आहे.
Raipur : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन भारतीय राजकारणात ‘गेम चेंजर’ ठरणार – मुख्यमंत्री बघेल
सीरियातील यादवी युद्धामुळे लक्षावधी लोकांनी शेजारील तुर्कीमध्ये आश्रय घेतला आहे. सीरियात ज्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, तो भाग सरकारच्या ताब्यातील आणि बंडखोर विरोधकांच्या ताब्यातील भागामध्ये विभागला गेला आहे. या भूभागाभोवती रशियाच्या पाठिंब्यावरील सरकारी फौजांचा वेढा पडलेला आहे. त्यामुळे या भूभागात मदत थेट उपलब्ध केली जाणेही अवघड बनले आहे. भूकंपाचे वृत्त समजताच मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आल्याचे तुर्कीचे अध्यक्ष रेसिप तय्यिप इर्दोगन यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तईप एर्दोगन यांनी ट्विटरवर सांगितले की, भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव पथके तातडीने पाठवण्यात आली आहेत. भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही एकत्रितपणे या आपत्तीवर लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसानासह मात करू. त्यांनी पुढे म्हटले आहे की, भूकंपाच्या वेळी किमान 6 वेळा धक्के जाणवले. एर्दोगन यांनी लोकांना नुकसान झालेल्या इमारतींमध्ये प्रवेश न करण्याचे देखील आवाहन केले आहे.
900 इमारतींचे नुकसान
तुर्कीच्या एकूण 7 प्रांतांमध्ये 284 जणांचा या भूकंपामुळे मृत्यू झाला आणि 440 जण जखमी झाले असल्याचे तुर्कीच्या आपत्कालिन व्यवस्थापन एजन्सीने म्हटले आहे. तर सीरियात सरकारचे नियंत्रण असलेल्या भागात 237 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 630 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत, असे सीरियाच्या सरकारी माध्यमाने म्हटले आहे. सीरियातील अलेप्पो आणि हामा शहरापासून तुर्कीच्या दियारबाकीर शहरापर्यंतच्या सुमारे 900 इमारतींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.