मुंबई – गेल्याअनेक दिवसांपासून शिवसेनेतील अनेक नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमकतेने विविध आरोप करत आहेत. अशातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत नवीन वर्षाचा एक संकल्प केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केलेत.
यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. त्यांनी पाच नेत्यांची नावं सांगितलं आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरणही किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असणार असल्याचं सांगितलं होत.
त्यानुसार काल दि. 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला 19 बंगल्यांच्या प्रकरणी किरीट सोमय्या ‘रश्मी ठाकरे’ यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या आरोपाला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या ‘सुषमा अंधारे’ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. “किरीटभाऊंचा टेस्ट बदलला असले, ऐरवी ते उद्योगांबाबत बोलतात, आता त्यांचा बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला आहे’. अशी टीका त्यांनी केली.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “भाजप नेते किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असतं. फक्त ते आरंभशूर फार आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचं काहीच होत नाही. राहिला प्रश्न 19 बंगल्याचा जर किरीटभाऊंचा टेस्ट बदलला असेल, ऐरवी ते उद्योगांबाबत बोलतात, आता जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे.” असं म्हणतं सुषमा अंधारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.