मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेली लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या नावे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुफान गर्दी दिसत असून, एक नृत्यांगना हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणावर संतापून जोरदार मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र ही तरुणी गौतमी पाटीलच असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याशिवाय हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे? हे देखील सांगण्यात आले नाही. एका नेटकऱ्यानी आपल्या ट्विट अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
छेड काढणाऱ्या तरुणाला गौतमी पाटीलने थेट गर्दीत घुसून तुडवलं? VIDEO व्हायरल pic.twitter.com/Fls6kdpPYI
— Anish Bendre (@BendreAnish) January 2, 2023
दरम्यान, गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ‘गौतमी पाटील तिच्या डान्समधून अश्लीलता पसरवतेय आहे’ आणि त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या ह्याच लावणी कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.