“द बॉडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट

मुंबई – इमरान हाश्‍मी आणि ऋषि कपूर यांचा आगामी “द बॉडी’ हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा न्यू पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट “दृष्यम’चे निर्माता जीतू जोसेफ यांनी डायरेक्‍ट केला आहे. यात ऋषि कपूर आणि सोभिता धुलिपाला मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे.

या चित्रपटाच्या पोस्टर ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्शने ट्‌वीट  केले आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता या ट्रेलरमध्ये  ऋषि कपूर एका प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या माया यांच्या मृत्यूबाबत तपास करताना दिसत आहे. मायाची बॉडी मिसिंग असून इमरान हाश्‍मीवर खून केल्याचा संशय दाखविण्यात आला आहे.

तसेच ऋषि कपूर मृत्यूचे रहस्य शोधत असताना स्ट्रगल करत असताना दिसतात. परंतु ट्रेलर पाहता माया यांचा मृत्यू झाला की नाही याबाबत साशंकता वाटते. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्येही खूप उत्सुकता निर्माण झाली असून अनेकांनी ट्रेलर पाहिल्यानंतर लाखोंच्या संख्येने लाईक्‍स्‌ दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.