राज्यात बसस्थानकांवर आता जनऔषधी केंद्र

पुणे – कमी दरात औषधांचा पुरवठा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरअखेर राज्यातील 26 एस.टी बस स्थानकांवर जेनेरिक औषधांची दुकाने सुरू होणार आहेत. यामध्ये पुण्यातील स्वारगेट एस.टी. स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत सुरू होणाऱ्या जेनेरिक औषधांच्या केंद्रामुळे नागरिकांना स्वस्त औषधे मिळणार आहेत.

सर्वसामान्य नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने आर्थिक बचत करण्यासाठी इतर औषधांच्या तुलनेत स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने 26 डिसेंबर 2016 रोजी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 532 बस स्थानकांवर ही योजना राबविण्यात येणार होती.

मात्र, जाचक अटींमुळे निविदा प्रक्रियेस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने योजना रखडली होती. परंतु, यामधील अटी व शर्ती शिथील केल्याने निविदाकारांनी स्वारस्य दाखविले आहे. यासाठी, अनेक कंपन्यांनी बस स्थानकांची पाहणी केली आहे.
50 ते 60% औषधे स्वस्त मिळणार

या योजनेतून नागरिकांचा आर्थिक बोजा कमी होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एस.टी. स्थानकावरील जेनेरिक औषधांच्या दुकानात नागरिकांना 50 ते 60 टक्के स्वस्त औषधे मिळणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)