सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या लोकांची वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी उद्यापासून दररोज (रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा ) सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते ६ या वेळेत नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागात रोटेशन (चक्राकार) पध्दतीने ३ डॉक्टर व ३ पॅरामेडिकल स्टाफ कार्यरत असेल.
शिवाजी काॅलेजमध्ये सुरु होती ती तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागात सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.
डॉ. चंद्रकांत काटकर हे पथकप्रमुख असतील व डॉ ऋतूराज देशमुख व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत, यांच्या ड्यूटीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.