गेल्या महिन्यातच यामी गौतम आणि “उरी’चा डायरेक्टर आदित्य धरचे लग्न झाले आहे. लग्नाला एक महिनाही पूर्ण व्हायच्या आत यामी गौतमने नवीन सिनेमा स्वीकारला आहे. 2016 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या “पिंक’चे डायरेक्शन अनिरुद्ध रॉय चौधरीने केले होते.
त्या अनिरुद्ध रॉय चौधरीकडेच या सिनेमाच्या डायरेक्शनची जबाबदारी सोपवण्ययात आली आहे. या सिनेमाचे शिर्षक “लॉस्ट’ असे असेल आणि त्यामध्ये राहुल खन्ना, पंकज कपूर आणि तुषार पांडे हे अन्य कलाकार असणार आहेत.
हा सिनेमा प्रसारमाध्यमे, पत्रकारिता आणि मीडियाशी संबंधित आहे. यामध्ये यामी अर्थातच एक पत्रकार म्हणून दिसणार आहे. याचे शूटिंग कोलकाता आणि पुरुलियामध्ये केले जाणार होते. मात्र करोनाच्या साथीमुळे सगळे नियाजन विस्कटले.
आता ही साथ जरा आटोक्यात यायला लागल्यावर कोलकात्यातील शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. प्रसार माध्यमाशचा थेट समाजाशी संबंध असतो आणि समाजाचेच प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटत असते, हेच या सिनेमातून दाखवायचे असल्याचे अनिरुद्ध रॉय चौधरीने म्हटले आहे. या इमोशनल थ्रिलींग सिनेमा व्यतिरिक्त यामी सैफ अली खानबरोबर “भूत पोलीस’मध्येही दिसणार आहे.