पुणे – पुणे शहरातील करोनाबाधितांची संख्या 1 लाख 80 हजार 287 च्या घरात गेली असून, गेल्या 24 तासांत 321 रुग्णांची वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत मृत्यांची संख्या वाढली असून ती 11 आहे. त्यातील पाच रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. यांचा समावेश करून शहरात एकूण 4,660 जणांचा मृत्यू झाला आहे.
एकूण रुग्णांमधील 1 लाख 72 हजार 940 जण बरे झाले आहेत. याशिवाय, 230 रुग्ण अत्यवस्थ असून, एकूण 2,687 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दिवसभरातील स्वॅब टेस्टची संख्याही बुधवारी जास्त असून ती 5,414 आहे.