Pune Crime । शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांनी अटक केली. मोबीन सुलतान खान (वय-२७, रा. पीएमसी कॉलनी, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५२ हजारांच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
बी. पी. लोहियानगर येथून दुचाकी चोरणाऱ्या एक जण माडीवाला कॉलनी जवळ थांबायची माहिती पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम यांना बातमीदारा मार्फ़त मिळाली होती.
यानंतर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता मोबीन खान नाव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याने समर्थ, चतुःशृंगी आणि खडक पोलीस ठाण्याच्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली मोबीन खान कडून ५२ हजार किंमतीच्या ३ जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर,
आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षय कुमार वाबळे इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, तुळशीराम टेभुर्णे, महेश जाधव, यांचे पथकाने केली आहे.