पुण्यात नवीन 5,600 करोना बाधित

शहरात बाधितांची एकूण संख्या पोहोचली 3 लाखांपर्यंत


आणखी 47 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू; ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या आता 44 हजार 822

पुणे – शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या तीन लाखांजवळ पोहोचली असून, गेल्या चोवीस तासांत आणखी 5 हजार 600 करोना बाधित आढळले आहेत. पुण्यातील 38 रुग्णांसह 47 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मागील चोवीस तासांत 3 हजार 481 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील रुग्णसंख्या तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत 2 लाख 99 हजार 721 पुणेकर बाधित झाले असून, त्यापैकी 2 लाख 49 हजार 373 जण बरेही झाले आहेत.

तर 5 हजार 526 जणांचा मृत्यू झाला आहे. आजमितीला 44 हजार 822 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी 4 हजार 99 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. तर 915 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

दरम्यान, मागील चोवीस तासांत 17 हजार 389 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 15 लाख 93 हजार 736 संशयितांच्या स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या आहेत, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.