मुलांच्या हातात मोबाइल देतायं… सावधान; वडिलांनी पाहिला आपल्याच अल्पवयीन मुलीचा पॉर्न व्हिडिओ

वडिलांनी पाहिला आपल्याच अल्पवयीन मुलीचा पॉर्न व्हिडिओ


अन्‌… पोलीस तपासात आले धक्‍कादायक वास्तव समोर

पिंपरी – वडिलांनी आपल्याच अवघ्या अकरा वर्षांच्या मुलीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन्‌ त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. याबाबत मुलीला विचारणा करून वडिलांनी सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने केलेल्या चौकशीत धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

करोनामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या हातात मोबाइल द्यावा लागत आहे. तसेच या मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला मोबाइल घेऊन दिला. तसेच ई-मेलचे अकाऊंटही सुरू करून दिले. एकेदिवशी तिच्या वडिलांनी मुलीचा मोबाइल सहज हातात घेऊन पाहणी केली असता त्यांना धक्‍काच बसला.

ई-मेलच्या अकाऊंटवर त्या अल्पवयीन मुलीने कोणालातरी आपलाच पॉर्न व्हिडिओ पाठविल्याचे दिसून आले. यामुळे वडिलांनी तिला जाब विचारला. यावेळी मुलीने सांगितले की, कोणीतरी अनोळखी व्यक्‍तीने एक मेल पाठविला. त्या मेलमध्ये तिला अश्‍लिल चित्रफीत बनवून पाठविण्यास सांगितली. तसे न केल्यास तिला व तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे घाबरलेल्या त्या मुलीने आपलाच पॉर्न व्हिडिओ तयार करून पाठविल्याचे वडिलांना सांगितले. वडिलांनी तातडीने सायबर विभागाकडे धाव घेतली.

सायबर विभागाने चौकशीला सुरवात केली. कोणता मेल आला होता, याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता आपण तो डिलिट केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाइलची पाहणी केली असता त्यात इंस्ट्राग्रामवर तिचे अकाऊंट दिसून आले. त्यातील एका मुलाशी झालेले अश्‍लील चॅटींग पाहून पोलिसांना धक्‍काच बसला. त्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता अकाऊंट माझे असून माझी बालवाडीतील मैत्रीण ते सध्या वापरत असल्याचे पोलिसांना सांगितले.

मात्र पोलिसांना त्या मुलीची बनवाबनवी लक्षात आली. तरीही पोलिसांनी तिच्यावर विश्‍वास ठेवून अधिक चौकशी केली. ज्या मुलाशी चॅटींग केली त्यास चौकशीसाठी बोलावले. त्या मुलाचे वय 18 पेक्षा अधिक आहे. मात्र आपण ज्या मुलीशी चॅटींग करतो आहे तिचे वयच त्याला माहीत नव्हते. याशिवाय त्या अल्पवयीन मुलीनेच त्या मुलाला फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविली होती आणि चॅटींगलाही तिनेच सुरुवात केल्याचे समोर आले. त्यानंतर त्या मुलीनेच स्वतःचा व्हिडिओ तयार केल्याचे तपासात समोर आले.

किशोरवयीन मुलांना भिन्न लिंगाच्या व्यक्‍तीचे आकर्षण असते. त्यामुळे पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच त्यांचे सोशल मीडियासह सर्वच मित्र मैत्रिणी कोण हे देखील पाहिले पाहिजे. घरातील काही वस्तू गायब होत असल्यास याबाबत मुलांना विचारणा करा. काही केसेसमध्ये महिलांनी मुलांना अनैतिक गोष्टी करण्यासाठी जाळ्यात ओढले असल्याचे तपासात पुढे आले आहे.
– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्‍त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.