भयानक परिस्थिती! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

कोरोनामुळे अंबाजोगाईतील परिस्थिती विदारक

अंबाजोगाई: शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज शंभरच्या पुढे वाढत असताना मृत्यूचा दर देखील झपाट्याने वाढत आहे.

अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा वाढत आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सात आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग दिला.

यापूर्वी मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत याच ठिकाणी आठ मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बरोबर सात महिन्यानंतर पुन्हा तीच दुर्दैवी वेळ आली आहे.

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये परळी, केज, धारुर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे 60 ते 80 वयोगटातील असतात. हे सर्व रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात, त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.