नेवासा – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बुधवारी सांयकाळी ६ वाजता नेवासा शहरातील सुंदरबाई गांधी विद्यालय व भानसहिवरे (ता.नेवासा) येथील जिल्हा परिषद शाळा येथील मतदान केंद्राची पाहणी करून मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी आढावा घेतला. नेवासा पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी ओला यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील एका इमारतीमध्ये पाच किंवा पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असतील अशा ठिकाणी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याची मोहीम पोलीस अधीक्षक ओला यांनी हाती घेतली. मतदान केंद्रावर लोकसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी ओला यांनी यावेळी पाहणी करुन आढावा घेतला.
नेवासा शहरातील सुंदरबाई गांधी विद्यालय व भानसहिवरे (ता.नेवासा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना भेटी दिल्या. कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांच्याशी चर्चा केली. कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी विशेष मार्गदर्शन यावेळी केले. याप्रसंगी नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत करून कायदा हातात घेणाऱ्यांची पोलीस गय करणार नसल्याचा गर्भित इशारा पोलीस अधीक्षक ओला यांनी दिला.
आगामी लोकसभा निवडणूक निर्भयी, पारदर्शी आणि शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आतापासूनच विशेष खबरदारी घेत कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या असून विशेष मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे गृहखात्याने आतापासूनच लोकसभा निवडणूक शांततेत होण्यासाठी मोठी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.