नवी दिल्ली – पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास हा इस्रायलशी सतत चाललेल्या संघर्षात ज्या प्रकारच्या खेळी करतो तशाच खेळींचा वापर छत्तीसगड मधील नक्षलवादी करीत असल्याची बाब उघड झाली आहे. हमासचे दहशतवादी दुर्गम भागात बोगदा खणून त्यात आश्रय घेतात, तशाच प्रकारे राज्यातील नक्षलवाद्यांनी खणलेला एक बोगदा सुरक्षा दलाला आढळून आला आहे.
या बोगद्याचा वापर ते बंकर सारखा करीत होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भूमिगत बोगद्याची तपासणी केली, जो दंतेवाडा येथे उघडकीस आला होता, तेथे नक्षलवाद्यांचा अड्डा होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दंतेवाडाच्या घनदाट जंगलात गोळीबाराच्या वेळी सुरक्षा जवानांवर हल्ला करण्यासाठी हा बोगदा वापरला जात होता.
मंगळवारी दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर भीषण चकमक झाली. विजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १४ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांनी आता नक्षलप्रभावित भागातील तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहीमेच्यावेळी हा बोगदा निदर्शनाला आला.