नेवासा – नेवासा तालुक्यातील 16 गांवच्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी 48 तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 160 जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत 265 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 16 ग्रामपंचायतींपैकी एकही सरपंच पद बिनविरोध झालेले नाही.
राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या भानसहिवरा व पानसावडी या दोन्ही गावामध्ये सदस्य बिनविरोध झाले तरी सरपंच पदांसाठी निवडणूक लाधली गेली आहे.
दरम्यान सर्वात जास्त उमेदवार बालाजी देडगाव येथे 15 सदस्य असलेल्या जागेसाठी 51 उमेदवार तर सरपंचपदासाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. पाचेगाव, मुकिंदपूर या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सरळ लढती होत असल्याने या दोन्ही गावातील निवडणूकीची रणधुमाळी रंगणार आहे.
गाव- जागा – सदस्य संख्या तसेच उरलेले अर्ज पुढील प्रमाणे –
करजगाव ११ जागेसाठी २४, पाचेंगाव १३ जागेसाठी२६, फत्तेपूर ७ जागेसाठी १३(१ बिनविरोध), कौठा ९ जागेसाठी १८, शहापुर ७ जागेसाठी १४, पिचडगाव ७ जागेसाठी १४, नागापूर ७ जागेसाठी १९, जैनपूर ४जागेसाठी १३( तीन जागा बिनविरोध), सौंदळा ९ जागेसाठी १४, पानसवाडी १ जागेसाठी २ तर ८ बिनविरोध, मुकीनंदपूर १३ जागेसाठी २७, बालाजी देडगाव १५ जागेसाठी ५१, पानेगाव १ जागेसाठी २ (८ बिनविरोध), रस्तापुर ११ जागेसाठी २२ ( १बिनविरोध), भानस हिवरा 15 जागा बिनविरोध, खुणेगाव येथे सर्व ७ जागा बिनविरोध निवडले गेले आहेत.
सरपंच पदासाठी १६ गावामध्ये पुढील प्रमाणे उमेदवार रिंगणात –
करजगाव २, पाचेगाव २, फत्तेपूर ४, कौठा ३, शहापुर २, पिचडगाव ३, खुणे गाव २, नागापुर ३, जैनपूर ३, सौंदाला २, भानसहिवरा २, पानससावडी ४, मुकीनंदपूर २, बालाजी देडगाव ७, रस्तापुर ३, पानेगाव ४ उमेदवार रिंगणात आहेत..