नेवासा – खडका (ता.नेवासा) येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका १० वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवार (दि.१३) रोजी दुपारी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शाम प्रकाश कांबळे असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.
शामचे आई – वडील मोल-मजुरी करुन आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह भागवतात. या दुर्दैवी घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय मृतदेहाचे शविच्छेदन करण्यात आले.
खडका गावचे पोलीस पाटील सुभाष भांगे, तसेच सरपंच संदीप सोनकांबळे यांच्यासह खडका ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन मृतास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. चिमुकल्याच्या मृत्यूच्या घटमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.