नवी दिल्ली – इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा पुतळा ग्रॅनाईट मध्ये तयार केला जाणार असून तो पुर्ण होईपर्यंत इंडिया गेटच्याठिकाणी त्यांच्या पुतळ्याची प्रतिकृती ठेवली जाणार आहे. हा कार्यक्रम 23 जानेवारीला नेताजींच्या 125 व्या जयंती दिनी होणार आहे.
कॉंग्रेस पक्षाचे नेते असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते व भारतीय स्वातंत्र्य लढण्यात त्यांनी मोठेच योगदान दिले आहे. त्यांचा पुतळा उभारणीची घोषणा पंतप्रधानांनी ट्विटरवर केली आहे.
हा पुतळा म्हणजे संपुर्ण देशात त्यांच्या विषयी जी कृतज्ञता आहे त्याचे हे प्रतिक असेल असेही मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.