नेटकऱ्यांचा प्रियंकाला पुन्हा एकदा सल्ला

नवी दिल्ली – सध्या राजधानी दिल्लीत सर्वत्र हवा प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसत आहे. त्यातच आजपासून दिल्लीत प्रदूषण टाळण्यासाठी सम-विषमचा नियम लागू करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीतल्या या प्रदूषणावरून बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर एक फोटो शेअर असून, या फोटो वरून नेटकाऱ्यांनी प्रियंकाला चांगलंच ट्रोल केलं आहे.

सध्या प्रियांका नेटफ्लिक्स वरील ‘द व्हाइट टायगर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिल्लीत आहे. रविवारी प्रियंकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ‘मला इथे चित्रीकरण करणं खूपच अवघड जात आहे. अशा परिस्थितीत इथे राहण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्यूरिफायर आणि मास्क मिळण्याइतकी मी नशिबवान आहे. प्रत्येकानं सुरक्षित राहा इथल्या बेघरांसाठी प्रार्थना करा’. असं प्रियंकाने म्हंटल आहे.

मात्र, प्रिंकाच्या या पोस्टला उत्तर देत नेटकाऱ्यांनी तिला अनेक सल्ले दिले आहेत. ‘तुम्हाला सिगारेट ओढल्याने कोणताही त्रास होत नाही, पण प्रदूषणामुळे त्रास होतो. तसेच, एका यूझरने ‘प्रियंका परदेशात सिगारेट ओढल्याने काही होत नाही का तुला’. असं म्हंटल आहे. तर काही जण प्रियंकाच्या या वागण्याला दुटप्पी वागणं म्हणत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला होता. त्यामुळे सुद्धा प्रियंकाला ट्रोल करण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.