मुंबई – साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 325.8 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 578.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
आता अशी चर्चा सुरु आहे की, सुपरस्टार रजनीकांत केवळ दक्षिण चित्रपट उद्योगातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. म्हणजेच एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांच्यापेक्षा जास्त पैसे घेतो.
अलीकडेच ‘जेलर’च्या निर्मात्या कलानिती मारन यांनी रजनीकांत यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीत त्यांनी चित्रपटाच्या नफ्याच्या वाटणीचा धनादेश रजनीकांतकडे दिला. दक्षिणेतील चित्रपट व्यापार तज्ञ मनोबाला विजयबालनने सोशल मीडियावर कलानिधी मारन आणि रजनीकांत यांचा फोटो शेअर करताना सांगितले की, ‘रजनीकांतला देण्यात आलेला नफ्याचा धनादेश अंदाजे १०० कोटी रुपये आहे. रजनीकांतने ‘जेलर’साठी 110 कोटी रुपये फी आकारली होती. आणि आता त्याला 100 कोटी रुपयांचा नफ्याचा धनादेश मिळाला आहे. म्हणजेच त्याला ‘जेलर’ 210 कोटी रुपये फी मिळाली आहे. अशात तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.
मनोबालाने आणखी एका ट्विटमध्ये माहिती दिली आहे की, ‘जेलर’चे निर्माते कलानिधी मारन यांनी रजनीकांतला चेकसह BMW X7 कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर त्याने रजनीकांतला आणखी एक चित्रपट करण्याची विनंती केली आहे.