यवत – पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सहजपूर फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रेलरला रसायन घेऊन जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ही घटना शुक्रवार (दि.०१) रात्री साडेअकरा वाजता घडली असून या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही, घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. अपघातामुळे महामार्गवर सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात तीन वाहने आगीच्या भक्षस्थानी पडल्याची माहिती मिळात असून अपघात नेमका कसा झाला? काही जीवितहानी झाली का? त्याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही.
मात्र आगीत सापडलेला एक वाहन चालक जखमी झाला असून त्याला उपचारसाठी सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली असल्यास माहिती मिळाली आहे.