मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातही एका महिलेने विनयभंगाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी मला बेइज्जत करत माझा अपमान केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान नेमकं काय घडलं याचा व्हिडीओ देखील महिलेने ट्विट केला आहे.
“एनसीपीचे नेता जितेंद्र आव्हाड यांनी मला बेइज्जत केलं. मला हाताने पकडत तू इथं काय करत आहेत असं म्हणत धक्का दिला. मी एक महिला आहे आणि एका महिलेचा अपमान सरेआम केला जात आहे. पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करावी” अशी मागणी करत या महिलेने घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
NCP के विधायक जितेंद्र आव्हाड ने मुझे सरेआम बेइज्जत किया,मुझे हाथ से पकड़ कर धक्का दिया कहा तू यहां क्या कर रही है,मैं एक महिला हु इस तरह महिला का अपमान सरेआम किया जा रहा है,पुलिस प्रशासन इस पर कार्यवाई करे @PMOIndia @CMOMaharashtra @DevendraForCM @ChitraKWagh @BJPMM4Maha pic.twitter.com/7vVGBlHUIH
— Rida Rashid (@bjpridarashid) November 14, 2022
गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारवर निशाणा साधत राजीनामा देणार असल्याचे ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार .. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत” अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022