राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या च्या पश्चिम भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसला आहे. गेली काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्यात मुसंडी घेतली आहे.
जिल्हा दूध संघ जिल्हा बॅंक आणि तालुक्यातील अनेक सहकारी सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता काबीज केली आहे. त्यापूर्वी पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता खेचून आणली होती. तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार असल्याने गाव पातळीवरची अनेक कामे मार्ग लागत आहे.
आगामी पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. याचाच एक भाग म्हणून नायफड -औदर जिल्हा परिषद गटातील आंभू परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. याच गटामध्ये भाजपचे अतुल देशमुख मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने या गटातील भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
राजगुरुनगर येथे शनिवारी (दि. 4) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे वाशेरे गणाचे अध्यक्ष सुनील लोहोट, आंभूचे माजी सरपंच विठ्ठल राजगुरव, उपसरपंच शिवाजी राजगुरव, बाबुराव राजगुरव, दत्तात्रय तुपे, दत्तू लोहोट, विलास राजगुरव, बाळू राजगुरव, रोहन शिंदे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखाताई मोहिते, मंगलताई चांभारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पश्चिम विभाग अध्यक्ष नामदेव गोपाळे, किरण वाळुंज, आंभूचे सरपंच विनोद लोहोट, माजी सरपंच भागुजी राजगुरव, किसन मराठे, पाटीलबुवा काळोखे, संतोष लोथे, माउली कांबळे, दत्ता काळोखे, माऊली लोथे, माउली तुपे, चिंधू तुपे यांच्यासह अनेक पश्चिम भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
काहींना पश्चिम पट्टा भाजपचा असल्याची स्वप्न पडत होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पश्चिम भाग हा बालेकिल्ला आहे.या भागातील जनता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीमागे आहेत. पूर्वीचा वाशेरे नायफड गट आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मागे कायम उभा आहे. आगामी निवडणुकीतही हा भाग राष्ट्रवादीचा असल्याचे आम्ही दाखवून देणार आहोत. भविष्यात पक्षाची घोड दौड सुरूच राहील.
– अरुण चांभारे, संचालक, जिल्हा दूध संघ