अजित पवारांचा फोन आला, म्हणाले तातडीन धनंजय मुंडे यांच्या घरी या…

मुंबई – आजची सकाळ महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारी ठरली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापन करण्यास अंतिम टप्प्यात असतानाच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपन सरकार स्थापनेचा दावा केला.आज राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला.यानंतर दुपारी 12:30 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी शपथविधी सोहळ्याला हजर असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी रात्री घडलेली हकिकत सांगितली.

दरम्यान, यावेळी शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी काय घडल, याविषयीचा घटना सांगितली. आमदार राजेंद्र शिंगणे म्हणाले, “आम्हाला अजित पवारांचा फोन आला. महत्वाची बैठक आहे. चर्चा करायची आहे. तातडीनं धनंजय मुंडे यांच्या घरी या, असे अजित पवार म्हणाले. पक्षाच्या नेत्यांचा आदेश म्हणून मुंबईत पोहोचलो. त्यानंतर कल्पना न देता आम्हाला राजभवनात नेण्यात आल. तिथे गेल्यानंतर आम्हाला धक्का बसला. काही कळायच्या आतज शपथविधीही झाला”.

त्यानंतर राजभवनातून निघाल्यानंतर थेट शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही पक्षासोबत आहोत. शरद पवार घेतील तो निर्णय आम्ही पाळणार आहोत, असे राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी सांगितले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही या घटनाक्रमाला दुजोरा दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.