#NZvENG 1st Test : बीजे वाॅटलिंगचे शतक; न्यूझीलंडकडे ४१ धावांची आघाडी

माउंट माँगिन्यूई : न्यूझीलंड विरूध्द इंग्लंड दरम्यान माउंट माँगिन्यूई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये न्यूझीलंडने बीजे वाॅटलिंगच्या शतकी आणि काॅलिन डी ग्रैंडहोमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४१ धावांची आघाडी आहे. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंडने ६ बाद ३९४ धावांची मजल मारली आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मिचेल सैंटनर ३१ तर बीजे वाॅटलिंग ११९ धावांवर खेळत होता.

कालच्या ४ बाद १४४ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडने १९७ धावांवर हेनरी निकोल्सच्या रूपाने पाचवा गडी गमावला. निकोल्सला ४१ धावांवर जो रूटने बाद केले. त्यानंर बीजे वाॅटलिंग आणि काॅलिन डी ग्रैंडहोमने डाव सावरत सहाव्या विकेटसाठी ११९ धावांची भागिदारी केली. ग्रैंडहोमला ६५ धावांवर बेन स्टोक्सने बाद केले. त्यानंतर मिचेल सैंटनरच्या साथीने वाॅटलिंगने न्यूझीलंडचा डाव सावरला व आणखी पडझड होऊ दिली नाही.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावसंख्येवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजीत बेन स्टोक्सने सर्वाधिक ९१ तर जो डेनलीने ७४, राॅरी बर्न्सने ५२ तर जोस बटलरने ४३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात गोलंदाजीत टीम साउदीने सर्वाधिक ४ तर नील वैगनरने ३ , काॅलिन डी ग्रैंडहोमने २ आणि ट्रेंट बोल्टने १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :

न्यूझीलंड : पहिला डाव – १४१ षटकांत ६ बाद ३९४
(केन विलियमसन ५१, काॅलिन डी ग्रैंडहोम ६५, बीजे वाॅटलिंग नाबाद ११९, मिचेल सैंटनर खेळत आहे ३१, बेन स्टोक्स २/३७,सैम करन २/७४, जो रूट १/३१, जैक लीच १/९७.)

इंग्लंड : पहिला डाव : १२४ षटकांत सर्वबाद ३५३ ( बेन स्टोक्स ९१, जो डेनली ७४, राॅरी बर्न्स ५२, टीम साउदी ४/८८, नील वैगनर ३/९०, काॅलिन डी ग्रैंडहोम २/४१)

Leave A Reply

Your email address will not be published.