मुंबई – राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावरील गुरुवारी होणारी सुनावणी ऐनवेळी रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रकृती स्थीर नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले असून लवरकच सुनावणीचे वेळापत्रक तयार होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली.
सध्या विधासभा अध्यक्षांच्या कोर्टात शिवसनेच्या आमदार अपत्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी लवकरच सुरु होईल. पण या सुनावणीला देखील सध्या ब्रेक लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सुनावणी होणे अपेक्षित होते. पण आता या सुनावणीचे नवीन वेळापत्रक आल्यानंतरच तारीख निश्चित होणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या मान्यतेनंतरच वेळापत्रकानुसार सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरील सुनावणीला कधी वेग येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.