सिडनी – पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत यजमान ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी २ बाद ११६ अशी दमदार मजल मारली होती. मात्र, सातत्याने पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. पहिल्या डावात पाकिस्तानने ३१३ धावा केल्या होत्या आता त्यांच्यकडे अद्याप १९७ धावांची आघाडी आहे.
बुधवारच्या बिनबाद ६ धावांवरून ऑस्ट्रेलियाने पुढे खेळ सुरु केल्यावर सलामावीर डेव्हिड वॉर्नर व उस्मा ख्वाजा यांनी ७० धावांची सलामी दिली. स्थिरावलेला वॉर्नर ३४ धावांवर परतला. त्यानंतर ख्वाजाने मार्नस लेबुशेनसह संघाचे शतक फलकावर लावले. अर्धशतकाच्या जवळ आलेला ख्वाजाही आततायी फटका खेळून ४७ धावांवर परतला. त्यानंतर लेबुशेनने स्टीव्ह स्मिथसह संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
IND vs SA Test Series : दक्षिण आफ्रिकेत ‘अशी ‘कामगिरी करणारा भारत ठरला पहिला आशियाई संघ…
अर्थात या कामी त्यांना पावसाचीही मदत झाली. संततधार पावसामुळे अखेर खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात २ बाद ११६ धावा केल्या होत्या. लेबुशेन २३ तर स्मिथ ६ धावांवर खेळत आहेत. पाकिस्तानकडून आगा सलमान व अमर जमाल यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.
No play is possible in the final session due to rain 🌧️
Aamir Jamal and Salman Ali Agha among the wickets as Australia trail by 197 runs 🏏#AUSvPAK pic.twitter.com/gMpAgEMubs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 4, 2024
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान पहिला डाव – सर्वबाद ३१३ धावा. ऑस्ट्रेलिया पहिला डाव – ४७ षटकांत २ बाद ११६ धावा. (उस्मान ख्वाजा ४७, डेव्हिड वॉर्नर ३४, मार्नस लेबुशेन खेळत आहे २३, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६, आगा सलमान १-१८, अमर जमाल १-२६).