बारामती (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 हजार रुपयांचा धनादेश प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड 19 साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून 50 हजार रुपयांचा धनादेश प्रांतअधिकारी यांच्याकडे देण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तेजस शिंदे ,सरचिटणीस विठ्ठलराव गोळे त्यांच्या प्रयत्नातून संघटनेचे सदस्य कामगार यांच्या माध्यमातून निधी संकलित करण्यात आला.
यासाठी टॉवेल इंजीनियरिंग, औरंगाबाद इंडस्ट्रीज व बिल्ट ग्राफिक्स येथील कामगार यांचे सहकार्य लाभले. तालुकाध्यक्ष संग्राम जगताप तसेच विक्रम बलवंड ,वल्लभ गावडे यांच्या सहकार्याने धनादेश प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.