प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा ११ एप्रिल पासून गायब आहेत. जगभरातील माध्यमांनी कोरियाच्या हुकूमशाह बद्दल दवे-प्रतिदावे केले आहेत. अशातच कोरियाच्या एका अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. किम जोंग उन मिसाईल चाचणी करता वेळी जखमी झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच किम जोंग उन दिसत नसल्याचे त्याने दावा केला आहे.
दक्षिण कोरियाच्या एका वृत्तपत्रात लिहले आहे कि, १४ एप्रिलला मिसाईल चाचणी करता दरम्यान जखमी झाले आहेत. १४ एप्रिल पर्यंत किम जोंग उन चांगले होते. त्यांनी त्याचवेळी मिसाईल चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याच वेळी जोम जखमी झाल्याची शक्यता किम जोंग उनच्या वर्कस पार्टीचे एक अधिकारी ली जिओंग हो यांनी वर्तवली आहे. तसेच हो यांनी किम जोंग उन ब्रेन डेड झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
जोम यांच्या बातमी नंतर जगभरात खळबळ उडाली आहे. तर उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंगमध्ये लोकांनी घाबरून आत्यावश्यक साहित्य खरेदी करण्यास सुरवात केली आहे. जपान आणि हाँगकाँग यांनी जोम यांची तबियत नाजूक असल्याचे म्हटले आहे. तर दक्षिण कोरियाने जोम यांची तबियत ठणठणीत असल्याचा दावा केला आहे.