Nayanthara – संजय लीला भन्साळी हे अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांच्या चित्रपटांची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतात. ते एक चित्रपट निर्माता आहे जे प्रत्येक चित्रपट अत्यंत उत्कटतेने आणि परिपूर्णतेने पूर्ण करतात. प्रेक्षकांना पूर्वी कधीही न आल्यासारखा अनुभव त्यांच्या चित्रपट बघितल्यानंतर होतो.
रुपेरी पडद्यावर येण्यापूर्वी संजय लीला भन्साळी त्यांच्या कोणत्याही चित्रपटात वर्षानुवर्षे काम करण्यावर विश्वास ठेवतात. विशेष म्हणजे त्याचा पुढचा ‘बैजू बावरा’ (Baiju Bawra) हा प्रोजेक्ट गेल्या दोन दशकांपासून त्यांच्या मनात आहे. जे आता लवकरच पूर्ण देखील होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल खूप बातम्या ऐकायला मिळत आहेत.
पहिल्यांदा रणबीर कपूर, नंतर कार्तिक आर्यन आणि शेवटी रणवीर सिंहला लीड रोल देण्यात आला आहे. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सिनेमाच्या टीममधून बाहेर पडली आणि अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात आलं.
मात्र, आता नुकतंच या सिनेमाबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘बैजू बावरा’ (Baiju Bawra) या सिनेमात अभिनेत्री ‘नयनतारा’ (Nayanthara) देखील मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
‘जवान’च्या घवघवीत यशानंतर नयनताराच्या (Nayanthara) पुढच्या बॉलिवूड चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत आहेत. मात्र, अद्याप नयनताराने याबद्दल अधिकृत भाष्य केलेलं नाही किंवा तिने चित्रपटही साईन केलेला नाही.