Naxal Encounter – विजापूरच्या बंदेपारा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मंगळवारी सकाळी एक नक्षलवादी (Naxal Encounter ) ठार झाला.
घटनास्थळावरून एक एके-47 रायफलही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी बंदेपाराच्या जंगलात पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती.
त्यावेळी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात हा नक्षलवादी ठार (Naxal Encounter ) झाला. त्याचे बाकीचे साथीदार जंगलात पळून गेले.
मागील महिन्याच्या सुरुवातीला, 20 सप्टेंबर रोजी छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे जिल्हा राखीव रक्षकांच्या जवानांबरोबर झालेल्या गोळीबारात दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) वन विभागात सुरक्षा दलांनी सातत्याने शोध मोहीम राबवून नक्षलवाद्यांची नाकेबंदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची पळापळ सुरू झाली आहे.