अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून सासरचे लोक तिच्यावर अत्याचार करत असल्याचा दावा केला आहे. आपल्याच घराच्या हॉलमध्ये राहावे लागत असल्याचा दावा तिने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. दुबईहून परतलेल्या मुलांनाही सासरच्यांनी सर्व खोल्यांना कुलूप लावल्याने हॉलमध्ये झोपावे लागत आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी यांचे नाते बऱ्याच दिवसांपासून खराब होत आहे. नुकतेच नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दीकी यांनी आलियाविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आलियाने एक व्हिडिओ जारी करून आपली बाजू मांडली होती.
अशातच नव्या पोस्टमध्ये आलियाने खळबळजनक दावा केला आहे. तिने लिहिले आहे की, “गेल्या सात दिवसांपासून मला माझ्या पतीच्या घरी हॉलमध्ये राहण्यास आणि झोपण्यास भाग पाडले जात आहे. नुकतीच दुबईहून परतलेली माझी मुलं हॉलमध्ये माझ्यासोबत सोफावर दुमडून झोपली आहेत. पाहुण्यांसाठी बनवलेल्या टॉयलेटमध्ये मला अंघोळ करावी लागत आहे. मी या घरात खाऊ शकत नाही, झोपू शकत नाही. येथे कॅमेरेही बसवण्यात आले आहेत आणि माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.”
2020 मध्ये घटस्फोट घ्यायचा होता
2020 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मतभेद झाल्यानंतर आलिया घटस्फोट घेणार असल्याची चर्चा होती. तिने अभिनेत्याला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. मात्र पुन्हा दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, आणि दोघेही एकत्र आले. नवाजुद्दीनसोबत लग्न करण्यासाठी आलियाने तिचे नाव बदलले होते. लग्नादरम्यान तिने आपले नाव झैनब ठेवले होते, जे नंतर बदलून आलिया ठेवण्यात आले.