Nawazuddin Siddiqui : बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. लवकरच तो शैलेश कोलानूच्या ‘सैंधवा’ चित्रपटातून तेलुगूमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो विकास मलिक नावाच्या व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. मात्र नवाझुद्दीन बाबतची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एका मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीनने चित्रपटात काम करण्याच्या अनूभवाबाबत तेलुगू शिकण्याबाबतचे अनेक किस्से सांगितले. इतकेच काय तर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो एका घटनेचा बळी ठरला होता, असा खुलासाही त्याने केला. नवाजुद्दीन म्हणाला की, आम्ही श्रीलंकेत शुटींग करत होतो. समुद्रातील त्या एका प्रसंगामध्ये मी माझ्या बोटीतून पाण्यात पडलो. त्या लाटेनं माझ्या बोटीला जोरदार तडाखा दिला होता. पण मी बोटीतून उडी मारली आणि सुदैवानं मला कोणतीही इजा झाली नाही. हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो सीन छान शुट झाला. मला आशा आहे की, प्रेक्षकांना तो सीन आवडेल.”
यासोबतच नवाजुद्दीनने व्यंकटेशसोबत काम करण्याचा त्याचा अनुभवही शेअर केला. त्याने व्यंकटेशचे कौतुक करताना सांगितले की, ‘त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, त्याच्यासोबत शूटिंग करणं हा एक चांगला अनुभव होता. व्यंकटेशने अॅक्शन सीनमध्ये खूप मेहनत घेतली आहे. कोणाचीही मदत न घेता त्याने हे सर्व केले. चित्रपटात त्याची एक नवीन बाजू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मला विश्वास आहे की त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. माझ्या लक्षात आले की त्याच्याकडे खूप संयम आहे.”
तेलुगू भाषा शिकण्याविषयी बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, ‘नवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड असते, परंतु मला प्रॉम्प्टर्सवर विश्वास नाही, त्यामुळे सेटवरही मी माझ्या ओळी अगोदरच शिकत असे, जेणेकरून त्या पडद्यावर चांगल्या दिसल्या. मला विश्वास आहे की ही सर्व मेहनत फळ देईल. खरं तर कधी-कधी नकारात्मक भूमिका तुम्हाला चांगल्या भूमिकांपेक्षा अधिक वाव देतात.” ‘सैंधाव’च्या रिलीजबद्दल बोलायचे झाले, तर व्यंकटेश आणि नवाजुद्दीनचा चित्रपट 13 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.