साऊथचा सुपरस्टार धनुषचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कॅप्टन मिलर’चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिनेता खतरनाक भूमिकेत दिसत आहे. त्याचा नवीन आणि खतरनाक अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाच्या ट्रेलरवर धनुषच्या अॅक्शन अवताराचा बोलबाला आहे.
सुपरस्टार धनुषचा अॅक्शन अवतारात दबदबा
धनुषने ‘कॅप्टन मिलर’मधील त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो लांब केस आणि वाढलेली दाढी असलेला दिसत आहे. २.५४ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये धनुष ब्रिटिशांविरुद्ध एकटाच लढताना दिसत आहे. कधी तो शत्रूंवर गोळ्या झाडतांना दिसत आहे. तर कधी धारदार तलवारीने त्यांना मारतो. ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, तो एका गावाचे इंग्रजांपासून संरक्षण करत आहे, आणि यादरम्यान तो मरण्यापासून ते मारण्यापर्यंत जातो.
‘कॅप्टर मिलर’च्या ट्रेलरमध्ये धनुष एक डायलॉग म्हणतो की, ‘तुम्ही सैतानबद्दल ऐकलेच असेल. मी तो सैतान आहे, ज्याला लोक प्रेमाने कॅप्टन मिलर म्हणतात. यानंतर तो एकापाठोपाठ गोळ्या झाडू लागतो. ट्रेलरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत धनुष केवळ अॅक्शन करताना दिसतो. ‘कॅप्टन मिलर’चा ट्रेलर ज्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे, ते पाहून धनुषच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
या दिवशी धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ प्रदर्शित होणार
धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे. धनुष व्यतिरिक्त प्रियंका अरुल मोहन, शिवराज कुमार, निवेदिता सतीश, विनायकन आणि संदीप किशन हे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉर बोर्डाकडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. हिंदी व्यतिरिक्त ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी अनेक दक्षिण भाषांमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे.