Boycott Maldives Hashtag : काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक हॅशटॅग ट्रेंडिंगला आला आहे. ट्विटरवर बॉयकॉट मालदीव (Boycott Maldives) हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लक्षद्वीपला भेट दिली. या दौऱ्यातील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्यानंतर आता हा ट्रेंड सुरु झाला असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारताचा सुंदर समुद्रकिनारा लक्षद्वीप चर्चेत आले. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ते स्नॉर्कलिंग करताना दिसत होते. यासोबत पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेतानाचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले होते. पंतप्रधानांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच, भारतात लक्षद्वीप ट्रेंड होऊ लागला. एवढेच नाही तर लक्षद्वीप हा भारतात गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा दहावा शब्द बनला.
पंतप्रधानांचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी लक्षद्वीपची मालदीवशी तुलना करण्यास सुरुवात केली. यानंतर अनेक नेटिझन्सने कमेंट करत सांगितले, लक्षद्वीपचा समुद्रकिनारा सुट्टीसाठी मालदिवपेक्षा चांगला पर्याय असू शकते. मालदीव हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असू शकतं, पण पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याद्वारे केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन संभावनांना चालना दिली आहे. याचा उद्देश लक्षद्वीपचा विकास होऊन तेथील लोकांचं जीवन सुधारण्यावर आहे.
लक्षद्वीपला मालदीवसारखे प्रमुख पर्यटन केंद्र बनवण्याची केंद्र सरकारची योजना आहे. मोदी सरकारने लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 1,150 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. लक्षद्वीप हे मालदीवच्या अगदी उत्तरेस, भारताच्या मुख्य भूभागाच्या पश्चिमेस 400 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळेच सोशलमिडीयावर सध्या बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंड होताना दिसून येत आहे.