Actor Siddhant Chaturvedi – ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे अनेक नवीन स्टारकिड्स लाँच केल्यानंतर, चित्रपट निर्माती झोया अख्तर तिचा आगामी चित्रपट ‘खो गये हम कहाँ’ च्या रिलीज झाला आहे. या चित्रपटात आदर्श गौरव, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग वेळी अभिनेता सिद्धांत आणि त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा यांचा ये व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला गुपचूप डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे,
सिद्धांतच्या ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये पापाराझींसमोर नव्याला लाजवताना दिसल्यापासून हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेही या चित्रपटात आहे. अशात नव्या त्याला आधार देण्यासाठी तिच्या आलिशान कारमधून थिएटरमध्ये पोहोचली.
सिड आणि अनन्या व्यतिरिक्त, आदर्श गौरव देखील आगामी ड्रामा चित्रपटात विशेष भूमिका साकारत आहे. या तिघांना त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसले. अनन्याने ऑफ-शोल्डर टॉप आणि व्हाइट स्नीकर्ससह बॅगी डेनिम परिधान केले होते. तर सिडने मॅचिंग टी-शर्ट आणि प्रिंटेड शर्टसह काळी कार्गो पॅन्ट घातली होती. आदर्शने निळ्या डेनिमसह जांभळ्या रंगाचे जाकीट घातले होते.
यापूर्वी नव्या सिद्धांतच्या पालकांसोबत बसलेली दिसली होती. यासह एका पार्टीमध्ये देखील एकाच कारमधून जाताना दोघे स्पॉट झाले होते. यानंतरच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र दोघांनी अद्याप याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.