ठाणे – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य केले होते. राज ठाकरे म्हणाले होते, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला. या पार्श्वभूमीवर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलतांना थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या,’येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान अर्थात मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत हनुमान चालीसा पठणाचं आवाहन केलं आहे.