वॉशिंग्टन –अमेरिकेत राहणाऱ्या ट्रॅप फॅमिलीने जगातील सर्वात उंच कुटुंब होण्याचा बहुमान मिळवला असून त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अमेरिकेतील मिनिसोटा येथे राहणाऱ्या ट्रॅक फॅमिलीतील सर्व सदस्यांची सरासरी उंची 203 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्या कुटुंबात राहणाऱ्या स्कॉट क्रिसी सवाना मौली आणि ऍडम या सर्वांचीच उंची सहा फूट आठ इंच किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
या परिवारातील क्रिसी ही एकमेव सदस्य अशी आहे जीची उंची फक्त सहा फूट तीन इंच आहे. या परिवारात राहणारा ऍडम सर्वात लहान सदस्य असून त्याची उंची सात फूट तीन इंच आहे.त्यानंतर 27 वर्ष सवानाची उंची 6 फूट आठ इंच आहे. बहिण मौलीची उंची सहा फूट सहा इंच आहे या तीन भावंडांची आई असलेल्या क्रिसीची उंची मात्र फक्त सहा फूट तीन इंच आहे. घरातील पिता स्कॉट सहा फूट आठ इंच उंचीचे आहेत. या सर्व सदस्यांची सरासरी उंची सहा फूट 8 इंचपेक्षा जास्त आहे म्हणून या कुटुंबाची नोंद जगातील सर्वात उंच कुटुंब अशी करण्यात आली आहे. गिनिज रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबाची उंची तपासण्यासाठी तब्बल तीन दिवसाचा कालावधी घेतला होता सर्व शास्त्रीय परिमाणे आणि निकष यांचा वापर करून या कुटुंबाची निश्चित उंची किती आहे. ते शोधण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सर्वात उंच कुटुंब या आशयाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.