मुंबई – राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. तसेच शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे.
शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमाणेच राष्ट्रवादी कुणाची? याबाबतच प्रकरण निवडणूक आयोगात आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टातही हे प्रकरण सध्या सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी थेट शरद पवार यांच्या नेतृत्वावरच बोट ठेवले आहे. शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, असा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केल आहे.