वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धा : महाराष्ट्राच्या खेळाडूंचा शानदार प्रारंभ

पुणे : महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनातर्फे आयोजित केलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेतील महिला गटात महाराष्ट्राच्या सुनीता पटेल हिने तर पुरुष गटात वीर चत्रानी याने मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळविला.

अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्‍लब, मुंढवा, आणि आरएसआय या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष गटात महाराष्ट्राच्या वीर चत्रानी याने महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित ऐश्वर्य सिंग याचा 9-11, 11-5, 10-12, 11-3,11-3 असा पराभव केला.

महिलांच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकित सुनीता पटेल हिने पाचव्या मानांकित राधिका राठोर या मध्यप्रदेशच्या खेळाडूला 11-5,12-10, 9-11, 11-4 असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित सानिका चौधरी हिने आपलीच सहकारी दिया मुलाणी हिचा 13-11,11-6, 11-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्ना हिने महाराष्ट्राच्या योश्ना सिंग हिला 11-9, 11-3, 12-10 असे पराभूत करून आगेकूच राखली.

पुरुषांच्या 45वर्षावरील गटात महाराष्ट्राच्या विनय रौथन,आशुतोष पेडणेकर, कर्नाटकच्या अनुप कबडवाल, नवीन शेनॉय यांनी आव्हान राखले. व्यावसायिक विभागात महाराष्ट्राच्या महेश कदम, जयनेंद्र भंडारी, सेनादलाच्या जयसिंग थोरी, उत्तरप्रदेशच्या शादाब आलम, राजस्थानच्या विकास जांगरा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीतअ पराजित्व राखले.

स्पर्धेचे सविस्तर निकाल :

पुरुष गट: पहिली फेरी:

गौरव नंदराजोग(दिल्ली)वि.वि.यश भार्गवा(दिल्ली)1011-7, 5-11, 11-8, 11-1;
वीर चत्रानी(महाराष्ट्र)वि.वि.ऐश्वर्य सिंग(महाराष्ट्र)119-11, 11-5, 10-12, 11-3, 11-3
संदीप जांगरा(सेनादल) वि.वि.विजय कुमार(सेनादल)411-3, 4-0-सामना सोडून दिला;
अभिषेक अगरवाल(महाराष्ट्र)वि.वि.रवी दिक्षित(सेनादल)41 12-10, 11-7, 4-11, 11-9
रणजित सिंग(सेनादल)वि.वि.राहुल बैठा(महाराष्ट्र)13 11-8, 11-3, 11-6
जमाल साकिब(सेनादल)वि.वि. अवदेश यादव(सेनादल)25 11-5,13-11,11-5

महिला गट:पहिली फेरी :

सानिका चौधरी(महाराष्ट्र)वि.वि.दिया मुलाणी(महाराष्ट्र)13-11,11-6, 11-2;
सुनीता पटेल(महाराष्ट्र)वि.वि.राधिका राठोर(मध्यप्रदेश)511-5,12-10, 9-11, 11-4;
तन्वी खन्ना(दिल्ली)वि.वि.योश्ना सिंग(महाराष्ट्र)11-9, 11-3, 12-10;
अंजली सेमवाल(महाराष्ट्र)वि.वि.सुनयना कुरुविला(तामिळनाडू)3
अपरजिथा बालमुरुकन(तामिळनाडू) वि.वि.अन्वेषा रेड्डी(तामिळनाडू)
सान्या वत्स(दिल्ली)वि.वि.ऐश्वर्या खुबचंदानी(महाराष्ट्र)1611-4, 11-1, 4-11, 11-9;

पुरुष 45वर्षावरील गट: पहिली फेरी:

अनुप कबडवाल(कर्नाटक)वि.वि.विराज मडकवी(महाराष्ट्र)11-8, 12-14, 11-2, 11-3;
विनय रौथन(महाराष्ट्र)वि.वि.विजय सोनावणे(महाराष्ट्र)11-9, 11-6, 11-6;
आशुतोष पेडणेकर(महाराष्ट्र)वि.वि.शिशिर गुप्ता(महाराष्ट्र)11-7, 11-2, 11-4;
नवीन शेनॉय(कर्नाटक)वि.वि.आशिष मेहता(महाराष्ट्र)11-9, 8-11, 5-11, 16-14, 11-9;

प्रो कोच: पहिली फेरी:

महेश कदम(महाराष्ट्र)वि.वि.अभिषेक गमरे(महाराष्ट्र)8-11, 11-3, 10-12, 11-7, 11-7;
शादाब आलम(उत्तरप्रदेश)वि.वि.नरेश बानोधा(मध्यप्रदेश)12-10, 11-2, 12-10;
विकास जांगरा(राजस्थान)वि.वि.आकाश बानोधा(मध्यप्रदेश)11-3, 11-5, 9-11, 11-7;
जय सिंग थोरी(सेनादल)वि.वि.साईराज मरावर(महाराष्ट्र)11-7, 11-6, 5-11, 10-12, 11-3;
जयनेंद्र भंडारी(महाराष्ट्र)वि.वि.तथागत मल्हारे(महाराष्ट्र)11-7, 11-3, 11-6;

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.