जशपूर :– छत्तीसगडमधील जशपूर जिल्हा कारागृहातून दोन कच्चे कैदी कारागृहाची 23 फूट उंच भिंत पार करून पळून गेल्याची घटना घडली आहे. यातील एक कैदी खुनाचा आरोपी होता आणि दुसरा बलात्काराचा आरोप असलेला होता. या दोघांनी सोमवारी सकाळी 23 फूट उंचीच्या कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारली आणि पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले.
जशपूर कारागृहाचे अधीक्षक मनीष संभाकर यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी तुरुंगातील कैद्यांसाठी जेवण बनवण्याची तयारी सुरू असताना या दोघांनी कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारली.
या आरोपींच्या पलायनाची बातमी सर्व राज्यभर नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आली असून त्यांच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या कारागृहातील अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.