Suryakumar Yadav – भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर असून सध्या दोन्ही संघामध्ये ३ सामान्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारतावर १ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसरा सामना ७ डिसेंबरला बुधवारी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाचे लक्ष घेऊनच मैदानात उतरेल. भारताने हा सामना गमावल्यास बांगलादेश मालिकेत विजय मिळवेल. दरम्यान, भारताचा टी-२० संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) या दौऱ्यासाठी संघाबाहेर ठेवले आहे. त्यामुळे या काळात सूर्यकुमार रणजी करंडकच्या २०२२-२३ या हंगामात खेळताना दिसू शकतो.
कानिटकर टीम इंडियाचे नवे बॅटिंग कोच; रमेश पोवारांकडे NCA, तर VVS Laxman कडे…
टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान असलेल्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) २०२२ वर्षात या छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा फाटकावल्या आहेत. त्यानंतर आता सूर्यकुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, सूर्यकुमार आगामी २०२२-२३ रणजी करंडक हंगामात मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. दुसऱ्या फेरीतील हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळण्यास सज्ज आहे.
कानिटकर टीम इंडियाचे नवे बॅटिंग कोच; रमेश पोवारांकडे NCA, तर VVS Laxman कडे…
मागील एक वर्षांपासून टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या सूर्यकुमार यादवचा ( Suryakumar Yadav ) बोलबाला राहिला आहे. त्याच्या मैदानावरील फलंदाजीच्या कौशल्याने अनेकांना भुरळ घातली आहे. मैदानावर आल्यानंतर ३६० डिग्री फटके खेळताना सूर्यकुमारला पहायला चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. टी-२० व्यतिरिक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारला अद्याप छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे त्याने त्याच्याकडे वेळ असल्याने रणजी करंडकात खेळण्याबाबत संकेत दिले आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेट कामगिरी
सूर्यकुमार यादवचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आकडे चांगले आहेत. त्याने ७७ सामन्यांच्या १२९ डावांमध्ये ४४.०१ च्या सरासरीने ५,३२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २०० धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिलेली आहे. सूर्यकुमारच्या आगमनामुळे मुंबईचा संघ अत्यंत मजबूत दिसत आहे. कारण पृथ्वी शॉ, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल आणि तुषार देशपांडे यांच्यासारख्या खेळाडूंची नावे अगोदरच संघात आहेत.