दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच सुपरस्टार विजय थलापतीच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. अभिनेत्री आज तिचा 26वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवशीच रश्मिकाने चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
नॅशनल क्रश रश्मिकाला तिच्या वाढदिवसी निर्मात्यांनी मोठी भेट दिली आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन वामशी पेडिपल्ली करणार आहेत. या सिनेमात रश्मिका विजय थलापतीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
सिनेमाची घोषणा करत निर्मात्यांनी रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. या सिनेमात रश्मिका आफ्रीन नामक काश्मिरी मुस्लीम तरुणीची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा तेलुगू, तामिळ आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्रीचा अलिकडेच पुष्पा हा सिनेमा येऊन गेला या चित्रपटाला सिनेगृहात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय तिचा ‘अॅनिमल’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रश्मिका बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच लवकरच ती ‘मिशन मजनू’ या सिनेमातदेखील दिसणार आहे.