नवी दिल्ली – अव्वल मानांकित नेदरलॅंडसविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी आज भारताचा २२ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कर्णधारपदी सविताला कायम ठेवण्यात आले आहे. तर भारताची आघाडीची खेळाडू राणी रामपालचे पुनरागमन झाले आहे. एफआयएच प्रो लीग मधील नेदरलॅंडसविरुद्धच्या लढतीसाठी संघात तिचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या या दोन्ही लढती शुक्रवारी, शनिवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणार आहेत.
याचबरोबर या संघात महिमा चौधरीआणि ऐश्वर्या चव्हाण या दोन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मागील स्पर्धेतील कामगिरी पाहता त्यांना मुख्य संघात स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय उपासना सिंग, प्रीती दुबे आणि वंदना कटारिया यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
भारतीय महिला संघ सध्या सहा सामन्यानंतर १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. नेदरलॅंडस संघ तेवढ्याच सामन्यानंतर १७ गुणांसह आघाडीवर आहे.
संघ –
गोलरक्षक – सविता (कर्णधार), रजनी इतिमार्पू
बचावपटू – दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता रश्मिता मिंझ, सुमन देवी थौदम
मध्यरक्षक – निशा, सुशिला चानू पुखरामबाम, ज्योती, नवज्योत कौर, मोनिका, नमिता टोप्पा, सोनिका, नेहा, महिमा चौधरी,
फॉरवर्डस – ऐश्वर्या चव्हाण, नवनीत कौर, राजविंदर कौर, राणी रामपाल, मरियाना कुजुर
राखीव – उपासाना सिंग, प्रिती दुबे, वंदना कटारिया